पुढारी ऑनलाईन: अफगाणिस्तानमध्ये आज शनिवारी (दि.०४) एकाच दिवशी सलग साखळी भूकंपाचे धक्के बसले. याबरोबरच ईशान्य भारतातील मणिपूर आणि उत्तरप्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानमध्ये शनिवारी (दि.०४) सकाळी ९.०७ वाजता ४.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या सलग दोन भूकंपाने अफगानिस्तान हादरले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनी खाली १८६ किमी होता, असे एएनआयने राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राच्या हवाल्याने म्हटले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली माहिती अद्याप समोर आलेली नाही.
यापूर्वी शनिवारी (दि.०४) मध्यरात्री ३ च्या सुमारसही अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू १७० किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे.
ईशान्य भारतातील मणिपूरमधील उखरुल या भागात मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. येथे शनिवारी (दि.०४) सकाळी ६ वाजून १५ मिनिटाने ४ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे.