Super Cows : चीनने क्लोनिंगने बनवल्या तीन ‘सुपर’ गायी!

Super Cows
Super Cows
Published on
Updated on

बीजिंग ः सतत नवे नवे भन्नाट प्रयोग करणार्‍या चीनने आता एक नवा दावा केला आहे. क्लोनिंगच्या सहाय्याने आपण अशा तीन 'सुपर' गायी (सुपरकाऊज) (Super Cows) तयार केल्या आहेत, ज्या वर्षाला 17 हजार 500 लिटर दूध देऊ शकतात असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. ब्रिटनमधील गायींच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. तिथे एक गाय वर्षाला 8000 लिटरपर्यंत दूध देते. चिनी माध्यमांनी गायींच्या प्रजननाचा हा प्रयोग दुधाची आयात कमी करणारा असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटिश वेबसाईट 'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या माध्यमातून अशा 1000 सुपर गायी (Super Cows) तयार करण्याचा चीनचा मानस आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास चीन जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश ठरू शकतो. सर्वाधिक दूध उत्पादन क्षमतेमुळे चीनमध्ये दुधाचा पुरवठा वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यात आणि निर्यात करण्यास मदत होईल.

या प्रोजेक्टचे नेतृत्व करणार्‍या जिन यापिंग यांनी सांगितले आहे की, गायींच्या (Super Cows) कानाजवळील ऊती घेऊन भ्रूण तयार केले आहे. त्यानंतर 120 गायींमध्ये त्या भ्रूणांचे प्रत्यारोपण करण्यात आले. ज्या गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले, त्यातील 42 टक्के गर्भवती झाल्या आहेत. सध्या अशा तीन गायींचा जन्म झाला आहे. 17.5 टक्के गायींचा जन्म पुढील काही दिवसांत होणार आहे. जोपर्यंत हे तंत्रज्ञान व्यावसायाशी जोडले जात नाही आणि त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत नाही तोवर त्याला काही अर्थ नाही.

यामुळे क्लोनिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे. यामुळे कमी दूध देणार्‍या गायींच्या गर्भात हायब—ीड भ्रूण प्रत्यारोपण करत सुपर गायींची (Super Cows) संख्या वाढवली जात आहे. ज्यामुळे अशा गायींची संख्या वेगाने वाढवत दुधाचे उत्पादनही वाढवले जाईल. चिनी वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लोनच्या माध्यमातून जन्मलेल्या गायींचे टिश्यू म्हणजेच ऊती जतन केले जातील, ज्यामुळे जास्तीत जास्त सुपर गायींना जन्म देण्यास मदत होईल. चीनमध्ये सध्या 66 लाख गायी आहेत. यामधील जवळपास 70 टक्के गायी विदेशातून आयात करण्यात आल्या आहेत. जर चीन 1000 सुपर गायी तयार करण्यात यशस्वी झाला तर दरवर्षी 1800 टन दुधाचे उत्पादन होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news