भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी. 
Latest

देशात घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात : भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतात लोकशाही पद्धतीने केवळ अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे दोनच पंतप्रधान निवडले गेलेआहेत. देशात लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येत आहे आणि खऱ्या लोकशाहीचा उदय झाला आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचे सर्वात मोठे उदाहरण असलेले राहुल गांधीही निवडणूक हरले होते, अशा शब्‍दांमध्‍ये भाजपने आज (दि.३०) काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. ( Dynastic politics under threat: BJP hits back at Kharge )

२०२४ ची लोकसभा निवडणूक लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी असेल, नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यास देशात हुकूमशाही येईल. रशियातील पुतीनप्रमाणे भाजप भारतावर राज्य करेल. अशी भीती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी व्यक्त केली होती. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या वक्तव्याचा खरपुस समाचार भाजपने घेतला. भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, "लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येत आहे. घराणेशाहीचे भविष्य काय असेल याची त्यांना (मल्लिकार्जुन खर्गे) चिंता आहे. ( Dynastic politics under threat: BJP hits back at Kharge )

जम्मू-काश्मीरमधील अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंब, पंजाबमधील बादल कुटुंब, हरियाणातील हुड्डा परिवार हे सगळे निवडणुकीत पराभुत झाले. अशोक गेहलोत यांचे पुत्र निवडणुकीत पराभुत झाले, अखिलेश यादव यांच्या पत्नीचाही पराभव झाला तर बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या मुलीला आणि तेलंगणामध्ये के. सी. राव यांच्या मुलीलाही पराभवाला सामोरे जावे लागले. घराणेशाहीच्या राजकारणाचे सर्वात मोठे उदाहरण असलेले राहुल गांधीही निवडणूक हरले, असा टोला लगावत विरोधकांमधील घराणेशाहीची जंत्रीच वाचून दाखवली. मल्लिकार्जुन खर्गे जे बोलत आहेत त्याचा अर्थ लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाहीचे राजकारण गेल्या निवडणुकीत मतदारांनी पूर्णपणे नाकारले आहे. आणि खऱ्या लोकशाहीचा उदय झाला आहे. त्रिवेदी म्हणाले.

लोकशाही पद्धतीने केवळ वाजपेयी आणि मोदी हे दोनच पंतप्रधान

सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, "भारतात लोकशाही पद्धतीने केवळ अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे दोनच पंतप्रधान निवडले गेले. पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून 'शून्य मतांनी' निवडून आल्याचेही ते म्हणाले. एप्रिल १९४६ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दोन वगळता सर्व मते वल्लभभाई पटेल यांना मिळाली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी निवड केली होती, लोकांनी निवडून दिलेले नव्हते. तसेच इंदिरा गांधी मतांच्या जोरावर सत्तेवर आल्या नव्हत्या, त्या काँग्रेसच्या अंतर्गत निर्णयाने पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. तर, राजीव गांधींना त्यांच्या इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर सहानुभूती मिळाल्याने ते पंतप्रधान झाले होते."

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT