पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ आज ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे विकी आणि कतरिना एकमेकांसोबत सात फेरे घेतले.
रिपोर्ट्सनुसार, कबीर खान, नेहा धुपिया, अंगद बेदी, शर्वरी वाघ, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे काही फोटोज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
या लग्नाच्या नियम आणि निर्बंधांमुळे लोकांनी सोशल मीडियावर अनेक मीम्सही शेअर केले आहेत. अलीकडेच लोकप्रिय कंडोम ब्रँड ड्युरेक्स इंडियानेही विकी-कॅटच्या लग्नाची एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे.
ड्युरेक्स इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "प्रिय विकी आणि कतरिना, जर आम्हाला आमंत्रित केले नाही तर तुम्ही मस्करी करत राहणार"
या पोस्टला कॅप्शन देण्यात आले आहे की, 'तुमच्या लग्नात प्रवेश करण्याचा विचार आहे' ड्युरेक्स इंडियाची ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका वापरकर्त्याने कमेंट करून लिहिले, 'खूप वैयक्तिक होत आहे!' तर दुस-याने लिहिले, 'हे या लग्नातील सर्वोत्तम मीम आहे, गुरू'.
7 डिसेंबरपासून कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. आज ते त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले.
हे ही वाचलं का ?