पुढारी ऑनलाइन डेस्क : Drugs Smuggling : आसाममध्ये अॅम्ब्यूलन्समधून तस्करी करण्यात येणारे तब्बल 14 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज आसाम पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Drugs Smuggling : ड्रग्ज तस्कर पोलिसांची नजर चुकवण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या आयडिया वापरत असतात. अनेकदा अशा प्रकारच्या आयडियांमुळे ते पोलिसांच्या हातावर तुरीही देतात. मात्र, अनेकवेळा पोलिस गुन्हेगारांच्या या युक्त्या शोधून काढून त्यांचे प्रयत्न हाणून पाडतात. आसाममध्ये असाच प्रकार उघडकीस आला आहे. जेव्हा ड्रग्ज तस्करांनी तस्करीसाठी अॅम्ब्यूलन्सचा उपयोग केला. जेणेकरून ते आरामात ड्रग्जची तस्करी करू शकतील. मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
इशान्य भारताच्या सीमाभागात सध्या अनेक दिवसांपासून ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. यापूर्वीच्या अनेक कारवाईंमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या साठ्यासह त्यांची तस्करी करणारे रॅकेट पकडले गेले आहे. तरीही अद्यापही नशील्या पदार्थांची तस्करी सुरूच आहे.
Drugs Smuggling : आसाम पोलिसांनी मंगळवारी रात्री गुवाहाटी येथे एका अॅम्ब्यूलन्सला पकडले ज्याच्यात तब्बल 14.10 कोटी किमतीचे ड्रग्ज तस्करीसाठी नेण्यात येत होते. यामध्ये तब्बल 50 हजार याबा टॅबलेट आणि 200 ग्राम हेरॉइन यांच्या सह अन्य ड्रग्जही सापडले आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मिराजौल इस्लाम असे आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे.
एएनआय या न्यूज एजन्सीने ट्विट करून या संबंधीचे वृत्त दिले आहे. "गुवाहाटी शहर पोलिसांनी काल रात्री एका रुग्णवाहिकेतून 14 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त केला. "आम्ही रुग्णवाहिकेतून 50,000 यबा गोळ्या, 200 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आणि एका व्यक्तीला अटक केली: पार्थ सारथी महंता, जॉइंट सीपी" असे एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा :