Donald Trump  
Latest

Donald Trump Secret Document Case : गोपनीय कागदपत्रे प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचे न्यायालयात आत्मसमर्पण; म्हणाले…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोपनीय कागदपत्रे प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (दि.१४) मियामी न्यायालयात आत्मसमर्पण केले. या प्रकरणाबाबत न्यायालयातील कार्यवाही ४५ मिनिटे चालली. या वेळी ट्रम्प यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला. सुनावणीनंतर ट्रम्प यांची सशर्त सुटका करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोपनीय माहिती बाळगणे, न्यायालयाच्‍या कामकाजात अडथळा आणणे आणि खोटी विधाने करणे असे एकुण ३७ गुन्हे दाखल आहेत. ट्रम्प यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हास्यास्पद आणि निराधार असल्याचे म्हटले होते. त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळत हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ट्रम्प यांची सुटका झाली असली तरी त्यांना काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. न्यायालयाने ट्रम्प यांना त्यांचे सहकारी वॉल्ट नौटा यांच्याशी बोलण्यास बंदी घातली आहे.

ट्रम्प यांनी जानेवारी २०२१ मध्ये व्हाईट हाऊस सोडले तेव्हा त्यांनी पेंटागॉन, सीआयए, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी आणि इतर गुप्तचर संस्थांकडील अत्यंत संवेदनशील माहिती असलेल्या गोपनीय फाइल्स सोबत घेतल्या होत्या. स्काय न्यूजनुसार, ट्रम्प यांनी शॉवर आणि बॉलरूममध्ये गुप्तचर माहिती असलेली कागदपत्रे ठेवली होती. 'एपी'च्या अहवालानुसार, एफबीआयने ट्रम्प यांच्या निवासस्थानातून जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये विदेशी राष्ट्रांच्या आण्विक क्षमतेच्या तपशीलांचा समावेश आहे.

अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल!

10 जून रोजी फ्लोरिडा येथील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या आरोपानुसार, ट्रम्प यांनी त्यांच्या मार-ए-लागो निवासस्थानात आणि क्लबमध्ये कार्यक्रमासाठी हजारो लोक येत असतानाही कागदपत्रे असुरक्षित ठेवली होती. या आरोपांमध्ये म्हटले आहे की, या कागदपत्रांचा अनधिकृत खुलासा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतो.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT