ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या कोंढवा परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवादी संघटना इसिसच्या भरतीची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएने अटक केली आहे. आरोपी डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात राहात असून त्याच्याकडे इसिसच्या भरतीची जबाबदारी होती. याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
एनआयएच्या तपासानुसार, ही संघटना देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. पुण्यात इंजिनियरला अटक केल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली होती. त्यानंतर ही पाचवी अटक करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर 3 जुलै 2023 रोजी NIA ने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख,अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.
हेही वाचा