पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नईतील एका उद्योजकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बाईक आणि कार देऊन सुखद धक्का दिला आहे. चलानी ज्वेलर्सचे मालक जयंती लाल चयंथी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ८ कार आणि १८ बाइक भेट दिल्या आहेत. ( Diwali gift)
जयंती लाल यांना दिवाळीभेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, "कंपनीसाठी काम करणारे कर्मचारी हे माझ्या कुटुंबातील सदस्य़ाप्रमाणेच आहेत. माझ्या उद्योगातील चढ-उतारांमध्ये त्यांनी मला कायम साथ दिली. त्यामुळेच मी सर्वांना कार आणि बाईक दिवाळी भेट दिली आहे. त्यांचा कामाला प्रोत्साहन देण्यासाठी मी हा उपक्रम राबवला आहे. कर्मचाऱ्यांनी मला निफा मिळवून देण्यासाठी नेहमीच कठोर परिश्रम घेतले आहेत." (Diwali gift)
आमच्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्ती या फक्त कंपनीच्या कर्मचारीच नाहीत तर ते माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना असे सरप्राईज द्यावे, अशी माझी इच्छा होती. प्रत्येक उद्योजकाने आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा आदर केला पाहिजे, असेही जयंती लाल म्हणाले. (Diwali gift )