Latest

Saudi Arabia T20 League | जगातील सर्वांत श्रीमंत T20 League सुरू करणार आहे सौदी अरेबिया; IPL संघ मालकांशी केला संपर्क

अविनाश सुतार

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_title" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : सौदी अरेबिया सरकार आखाती देशांमध्ये सर्वात मोठी टी २० लीग सुरू करण्याची योजना (Saudi Arabia T20 League)  बनवत आहे. याबाबत त्यांनी इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) संघाच्या मालकांसमोर प्रस्ताव ठेवला आहे. सौदी सरकारने या योजनेवर गतीने काम सुरू केले आहे. सौदीने अरेबिया ग्रँड प्रिक्ससोबत फार्मुला – १ रेस आणि गोल्फ टुर्नामेंट सुरू करण्यासोबत क्रिकेटमधील सध्याच्या संधीचा फायदा करून घेण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. तसेच यासाठी आयपीएल फ्रँचायझीशीही चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एजच्या वृत्तानुसार, सौदी अरेबिया सरकारच्या प्रतिनिधींनी इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) मालकांशी टी-20 लीगबाबत चर्चा केली आहे. अनेक देशांतील वरिष्ठ क्रिकेट प्रशासक, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी सांगितले की, त्यांना एक वर्षाहून अधिक काळापासून याबाबत माहिती होती. टी-20 लीगसाठी भारतीय खेळाडूंनाही परवानगी मिळू शकते. सध्या कोणत्याही भारतीय खेळाडूला निवृत्तीपूर्वी परदेशी टी-२० लीगमध्ये प्रवेश करता येत नाही. परंतु आयपीएलचे फ्रँचायझी संघ आधीच जगातील अनेक देशांमध्ये त्यांचे संघ मैदानात उतरवत आहेत.

Saudi Arabia T20 League क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक

कोणत्याही स्पर्धेसाठी आयसीसीची मान्यता आवश्यक असते. सौदी अरेबिया क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सांगितले. इतर खेळांमध्येही चांगली कामगिरी केल्याचे त्याने सांगितले. अशा परिस्थितीत ते क्रिकेटमध्येही तेच करू शकतात. ते खेळात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत आणि आशियातील क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे त्यांना मोठी संधी आहे.

सौदी अरेबियाला जागतिक क्रिकेटचे ठिकाण बनविण्याचे ध्येय

सौदी अरेबिया क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स सौद बिन मिशाल अल-सौद यांनी अरब न्यूजला सांगितले की, सौदी अरेबियाला जागतिक क्रिकेटचे ठिकाण बनवणे हे आमचे ध्येय आहे. फॉर्म्युला-1 येथे आधीच आयोजित केला जात आहे. इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसलमध्येही हिस्सा खरेदी केला आहे. अलीकडेच सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब अल नासेरने अनुभवी दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले आहे. गोल्फमध्येही मोठी गुंतवणूक झाली आहे. यावरून सौदी अरेबिया खेळाकडे मोठा व्यवसाय म्हणून पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.

यासंदर्भात सौदी अरेबियाचे सरकार आयपीएल मालक आणि बीसीसीआयच्या सतत संपर्कात आहेत. पण यामुळे आयपीएलमध्येही फरक पडू शकतो. याशिवाय सतत वाढत असलेल्या टी-२० लीगमुळेही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेत आहेत. आयपीएल 2023 बद्दलच बोलायचे झाले तर, न्यूझीलंडचे सर्व मोठे खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळत आहेत.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही सध्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. बीसीसीआय 2008 पासून याचे आयोजन करत आहे. तेव्हापासून बहुतेक देशांमध्ये स्वतःची T20 लीग सुरू आहे. या लीगमधून खेळाडूंनाही भरपूर कमाई होत आहे. आता सौदी अरेबियाने सर्वात मोठी टी-२० लीग सुरू करण्याची योजना आखली आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT