पुढारी ऑनलाइन डेस्क : Discovery : मध्यप्रदेशमध्ये ASI भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला प्राचीन मंदिरे, गुहा, मूर्ती , पाण्याची व्यवस्था शोधण्यात मोठे यश मिळाले आहे. राज्यातील उमरिया जिल्ह्यात बांधवगढाच्या जंगलात 1000 वर्षे जुनी 26 मंदिरे, तर 1500 वर्षापूर्वीच्या 26 गुहांची एक मोठी शृंखला सापडली आहे. सोबतच भगवान विष्णू, वराह यांच्या प्रतिमा आणि विशेष बौद्ध मूर्ती सापडल्या आहेत. संशोधनात सापडलेल्या गुहा या 2 ते 5 व्या शतकामधील असल्याचे ASI च्या माहितीत सांगितले आहे.
Discovery : या संशोधनासाठी बांधवगढाजवळ जवळपास 170 स्क्वेअर किमी इतका भाग निवडला गेला. या भागात मोठ्या पुरातत्वीय साइट्स असल्याचे 1938 मध्येच ओळखले गेले होते.
याविषयी माहिती देताना एएसआयचे सुप्रिटेंडंट शिवाकांत वाजपेयी यांनी सांगितले कि बांधवगढ टाइगर रिजर्व क्षेत्र 1100 स्क्वेअर मीटरमध्ये परसरलेले आहे. सध्या एकाच विभागातील तळात ही शोध मोहिम सुरू आहे. मिळालेल्या प्राचीन गुफा या मानव निर्मित आहेत. यामध्ये बौद्ध धर्माशी निगडीत नवीन मुख्य तथ्य सापडले आहे. व्याघ्र संरक्षण क्षेत्र असल्याने हे काम खूप आव्हानात्मक होते. वन विभागाच्या परवानगीने हे अभियान चालवण्यात आले.
Discovery : एएसआयच्या माहितीनुसार सापडलेली 26 मंदिरे कलचुरी काळातील असून 9 व्या ते 11 व्या शतकापर्यंत बौद्धकालीन मंदिर होते. यामध्ये दोन बौद्ध मठ, दोन स्तूप, 24 ब्राह्मी लिपी, 46 मूर्ती आणि दुस-या शतकापासून ते 15 व्या शतकापर्यंतच्या पाण्याचे व्यवस्थापनाचे आराखडे मिळाले आहेत. 46 मूर्त्या ज्या सापडल्या आहेत त्यात सगळ्यात मोठी मूर्ती वराहची आहे. तसेच गुफांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित अनेक रोचक गोष्टी समोर आल्या आहेत.
Discovery : उत्खननात मिळालेली वराह मूर्ती अतिशय वेगळी आहे. ही 6.4 मीटर लांब असून 5.03 मीटर उंच आणि 2.77 मीटर रुंद आहे. आतापर्यंतच्या मिळालेल्या सर्व वराह मूर्तींपेक्षा खूप मोठी आहे. या व्यतिरिक्त बांधवगढमध्ये मिळालेले 2 नवीन मंदिर समूह त्यांच्या वास्तूकलेला पाहता खूप मोठे संशोधन करण्यात एएसआयला यश मिळाले आहे. संशोधनात सापडलेले मंदिर -मठ यामुळे बांधवगढ मध्ये मत्तमयूर संप्रदायच्या असण्याचे संकेत देतात.
एएसआयच्या मते हे सर्व मंदिर आणि मूर्त्या राजा भीमसेन, महाराज पोता श्री, महाराज भट्टदेवच्या काळातील आहे.
हे ही वाचा :