पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध मालिका सीआयडीमध्ये फ्रेडरिकची भूमिका साकारणारे टीव्ही अभिनेते दिनेश फडणीस यांचे आज निधन झाले. दिनेश ५७ वर्षांचे होते. (Dinesh Phadnis ) मल्टिपल ऑर्गन फेल्योरमुळे कांदिवलीच्या तुंगा रुग्णालयात रात्री १२ वाजून ८ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Dinesh Phadnis)
टीव्हीचा लोकप्रिय क्राईम शो 'सीआयडी'मध्ये एक सीआयडी अधिकारी फेडरिक्सची प्रसिद्ध भूमिका दिनेश फडणीस यांनी साकारली होती. कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होतेय त्यांचे सहकलाकार, मित्र दयानंद शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, दिनेश हे लिव्हर, हार्ट आणि किडनीच्या समस्यांनी त्रस्त होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढत गेली. दिनेश फडणीस यांना ३० नोव्हेंबर रोजी कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सीआयडीशिवाय दिनेश तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दिसले होते. या मालिकेत त्यांचा कॅमियो होता. ते आमिर खानचा चित्रपट सरफरोशमध्येदेखील दिसले होते. दिनेश मराठी चित्रपट भरला हा मळवट रक्ताने या चित्रपटातही दिसले होते.
संबंधित बातम्या –