shahrukh khan
shahrukh khan

ShahRukh Khan: स्टायलिश अंदाजात मुंबईत परतला शाहरुख, डंकी ट्रेलरची प्रतीक्षा (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान सध्या आपला आगामी चित्रपट डंकी विषयी चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी आणि टीजर दोन्हीही फॅन्सच्या पसंतीस उतरले आहेत. आता चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा लागून राहिली आहे. (ShahRukh Khan) चित्रपट रिलीजच्या तयारीत तो खूप बिझी आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी तो मुंबईत परतला. तो नुकताच विमानतळावर कॅमेराबद्ध झाला. (ShahRukh Khan)

किंग खान स्टायलिश लूकमध्ये विमानतळाबाहेर दिसला. पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट, डेनिम जॅकेट आणि ट्राउजरमध्ये शाहरुख स्टायलिश दिसला. त्याने डोक्यावर टोपी आणि सिल्वर चेन घातली होती. सोबत मॅनेजर पूजा ददलानीहीदिसली.

विमानतळावरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फॅन्सकडून त्याला लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव झाला. एका फॅनने लिहिले, 'नेहमी स्टाईल मध्ये'. दुसऱ्या फॅनने लिहिलं, 'कोणतेही आश्चर्य नाही की तो किंग आहे.' अन्य फॅन्सनी पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजीदेखील पोस्ट केलीय.

(video – @iamamiramia वरून साभार)

logo
Pudhari News
pudhari.news