पुढारी ऑनलाईन डेस्क : सावरकरांचा अपमान केला गेला, तेव्हा मोर्चा का काढला नाही?, असा सवाल आज ( दि. १७ ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी आजच्या आपल्या भाषणात नेहमीचीच कॅसेट वाजवली. त्यानी कॅसेट पुढे न्यावी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या नाही, तो गेल्या ६० वर्षांपासून सुरु आहे."
फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेतून जाईल, असे वक्यव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी महामोर्चाला संबोधित करताना केले होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "तुमच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो".