नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने अबकारी धोरण घोटाळाप्रकरणी ईडी प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ मे पर्यंत वाढ केली आहे. सोमवारी ईडी प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढवण्यात आली आहे.
यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले की, 'आम्ही पटपडगंजमध्ये काम करत राहू, भाजपचे लोक कितीही प्रयत्न केले तरी काम थांबणार नाही.' दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ते आरोपी आहेत.
मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती आणि मनीष सिसोदिया सध्या ईडी तसेच सीबीआयच्या खटल्यात न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत.
अधिक वाचा –