खासदार संजय राऊत यांच्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घणाघाती टीका; म्हणाले तर त्यांच्यासारखा… | पुढारी

खासदार संजय राऊत यांच्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घणाघाती टीका; म्हणाले तर त्यांच्यासारखा...

पुणे : पुढारी वृतसेवा : “ज्या कुत्र्याला आम्ही आमच्या मतांवर राज्यसभेत पाठवलं आणि त्यानंतर तो आम्हाला कुत्रा म्हणत असेल तर त्याच्यासारखा महाकुत्रा कोणताच नसेल”, अशी घणाघाती टीका राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि सत्तार यांच्यातील शाब्दिक युद्धाने नवे वळण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना (ठाकरे गटाचे) मुखपत्र सामना या वृत्तपत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनावर कडक टीका केली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्याच आमदारांचे हाल उकिरड्यावरच्या कुत्र्यापेक्षाही बेकार होणार असल्याचे नमूद करीत बंड केलेल्या ४० आमदारांची तुलना ही भटक्या कुत्र्यासोबत केली गेली आहे. त्याबाबत सोमवारी (दि.८) खरीप आढावा बैठकीसाठी ते पुणे दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आपली सडेतोड भूमिका स्पष्ट करीत खा. संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.  “कुत्र्यासारखी अवस्था ही संजय राऊत यांची झाली आहे, रोज सकाळी उठून आमच्यावर भुंकण्याचं काम करतो. आम्हला ही वाईट शब्दाचा प्रयोग करता येतो, परंतु आमच्या मतावर त्याला आम्ही राज्यसभेत पाठवले आणि तो आम्हला कुत्रा म्हणत असेल तर त्याच्यापेक्षा महाकुत्रा दुसरा कोणीच नसेल.

संजय राऊत जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा देऊन निवडून यावं मी आव्हान करतो आणि मी पण राजीनामा देतो, त्या वेळेस लोकांना कळेल तो कोणाची अवलाद आहे माणसाची , की कुत्र्याची.” अशा पध्दतीने बोलणाऱ्या माणसाने थोडा तरी जिभेला लगाम लावून बोlलाव. अशा शब्दात सत्तार यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला असून हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Back to top button