पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एकाच कुटुंबातील झोपेत मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांनी घरात रात्रभर डासांपासून बचाव करण्यासाठी डास प्रतिबंधक जळत ठेवले होते. यामुळे कार्बन मोनोऑक्साइड तयार होऊन गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उत्तर पूर्व जिल्ह्याचे डीसीपी यांनी दिली आहे.
अतिरिक्त डीसीपी संध्या स्वामी यांनी सांगितले की, मच्छर प्रतिबंधक क्वाइल एका गादीवर पडली. त्यामुळे लागलेल्या आगीमुळे घरात धूर झालाय यात गुदमरल्याने ही घटना घडली. यात एका चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा