पुढारी ऑनलाईन – दिल्ली सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बापाला दोषी घोषित केले आहे. या गुन्ह्यात मुलगी गरोदर राहिली होती. पुढे बालकल्याण विभागाच्या आदेशाने या मुलीचा गर्भपात करण्यात आला. या भ्रूणाची करण्यात आलेली DNA चाचणी या खटल्यातील महत्त्वाचा पुरावा ठरली. DNA चाचणीतील निष्कर्ष ग्राह्य मानत सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी या बापाला दोषी ठरवले आहे. (Delhi court convicts man for rape of minor daughter after DNA matches with foetus of survivor).
१५ ऑक्टोबर २०२२ रोजी या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हा गुन्हा २०१७ला उघडकीस आला होता. "आरोपीची रक्तचाचणी, त्यानंतर या भ्रूणाची नाळ यांची केलेली DNA चाचणी यातून असे सिद्ध होते की ही गर्भधारणा दोषी बापाकडूनच झालेली आहे. सरकारी वकिलांनी हे DNA विश्लेषणातून हे सिद्ध केलेले आहे," असे न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
या प्रकरणात २०१७ ला Protection of Children from Sexual Offences (POCSO) कायद्यातील कलम ५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून मुलीचा गर्भपात करण्यात आला. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. जी. व्ही. राव यांनी बाजू मांडली. फक्त DNAचाचणी जुळणे हे कायद्यानुसार पुरेसे नाही, त्याल सांख्यखिक आधारही लागतो, असा बचाव त्यांनी मांडला; पण न्यायाधीशांनी DNA चाचणीत सर्व १५ मार्कर जुळले असल्याचे सांगत बचाव पक्षाचा युक्तीवाद फेटाळून लावला. या भ्रूणाची करण्यात आलेली DNA चाचणी या खटल्यातील महत्त्वाचा पुरावा ठरली. DNA चाचणीतील निष्कर्ष ग्राह्य मानत सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी या बापाला दोषी ठरवले आहे. आता १५ ऑक्टोबर २०२२ रोजी नराधम बापाला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
हेही वाचा