वैवाहिक बलात्कार प्रकरणावर पुढील वर्षी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

वैवाहिक बलात्कार प्रकरणावर पुढील वर्षी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वैवाहिक बलात्कार हा गुन्हा आहे की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय पुढील वर्षी म्हणजे, फेब्रुवारी २०२३ मध्ये सुनावणी करणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १२ मे रोजी या प्रकरणावर खंडित निर्णय दिला होता.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजीव शकधर हे गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्याच्या बाजूने होते. तर न्या. हरिशंकर यांनी त्यास बलात्कार मानण्यास नकार दिला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

वैवाहिक बलात्कार प्रकरणाला गुन्हेगारी श्रेणीत ठेवण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे मत भिन्न होते, त्यानंतर ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन (एआयडीडब्ल्यूए) आणि इतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शविली असून पुढील सुनावणी फेब्रुवारी २०२३ मध्ये हाेणार आहे.

हेही वाचलंत का? 

  1. Monsoon Update | मान्सून माघारीचा प्रवास लांबला, पुढील दोन आठवड्यांपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता
  2. पिंपरी : ड्रॅगन फ्रुट, किवीला वाढली मागणी ; डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला
  3. गोवा : आमदार दिगंबर कामत यांना जबरदस्त धक्का; मडगावात गेम चेंजर ठरला ‘विजय’

Back to top button