Latest

WPL 2023 final : मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स?

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023 final) चा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. आज या लीगला पहिला चॅम्पियन मिळेल. या विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने-सामने असतील.

या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 8 पैकी 6-6 सामने जिंकले. दिल्लीचा नेट रनरेट चांगला होता आणि त्यामुळेच त्यांना थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

हे दोन्ही संघ साखळी फेरीत दोनदा आमने-सामने आले आहेत. प्रथमच दोन्ही संघ 9 मार्चला आमने-सामने आले होते. या सामन्यात मुंबईने 9 गडी राखून विजय मिळवला आणि 20 मार्च रोजी दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने आले आणि यावेळी दिल्ली कॅपिटल्सने 9 गडी राखून विजय मिळवला. (WPL 2023 final)

नॅट सिव्हर हिची अष्टपैलू चमक (नाबाद 72 धावा व 1/21) आणि इसाबेल वॉग हिने हॅट्ट्रिकसह टिपलेले चार बळी याच जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एलिमिनेटर लढतीत यूपी वॉरियर्सवर 72 धावांनी विजय मिळवला आणि महिला प्रीमियर लीग या टी-20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्थळ : ब्रेबॉन स्टेडियम, मुंबई
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता

थेट प्रक्षेपण
स्पोर्टस् 18 चॅनलवर
लाईव्ह स्ट्रिमिंग
जीओ सिनेमा अ‍ॅपवर

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT