Latest

Deepak-Jaya Honeymoon : ‘हनीमूनला गेल्यावर पाठीची काळजी घे!’, चहरला बहिण मालतीची ‘गुगली’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) अलीकडेच गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत (jaya bhardwaj) लग्न केले. दोघांनी आग्रा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. दीपकने आपल्या लग्नासाठी खास मित्र आणि जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रित केले होते. दीपकचा भाऊ आणि पंजाब किंग्जचा फिरकीपटू राहुल चहर आणि त्याची पत्नी इशानीही लग्नाला उपस्थित होते. या लग्नाची बरीच चर्चा झाली. सोशल मीडियावर दीपकच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.

आता दीपक (Deepak Chahar) आणि जया हनिमूनला (honeymoon) जाणार आहेत. यासाठी दीपकची बहीण आणि अभिनेत्री मालती चहरने (malti chahar) तिच्या भावाला खास सल्ला दिला आहे. तिने भाऊ दीपकला इन्स्टाग्रामवरून त्याच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या असून त्याची फिरकी घेतली आहे. मालतीने दीपकला हनीमूनला जाताना ' तु पाठीची काळजी घे!' असे म्हटले आहे. वास्तविक, दीपक काही काळापासून पाठीच्या दुखापतीने ग्रस्त आहे. या कारणास्तव त्याने आयपीएल 2022 मधूनही माघार घेतली होती. (Deepak-Jaya Honeymoon)

मालतीने (malti chahar) इंस्टाग्रामवर दीपक (Deepak Chahar) आणि जया सोबतचा एक फोटो शेअर करत मजेदार पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते की, 'आता मुलगी आमची झाली. दोघांनाही त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दीपक चहर तु हनीमूनमध्ये तुझ्या पाठीची काळजी घे. विश्वचषक स्पर्धा येऊ घातली आहे.' या मजकूरात मालतीने एक मजेदार इमोजीही पोस्ट केली आहे. (Deepak-Jaya Honeymoon)

मालतीनेच (malti chahar) जुळवलं भाऊ दीपकचं लग्न..

मालतीनेच आपला भाऊ दीपक चहर आणि जया भारद्वाज यांची भेट घडवून आणली होती. मालतीने तिला आधीच आपली वहिनी म्हणून स्वीकारले होते. दीपक आणि जया यांचे खूप दिवसांपासून अफेअर होते, त्यानंतर एमएस धोनीच्या सांगण्यावरून त्यांनी आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये प्रपोज करण्याची योजना आखली होती. (Deepak-Jaya Honeymoon)

जया भारद्वाज (jaya bhardwaj) ही बिग बॉसचा माजी स्पर्धक अभिनेता आणि मॉडेल सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. ती मूळची दिल्लीची असून एक उद्योजिका आहे. जयाने मुंबई विद्यापीठाची पदवीधर असून एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करत होती. मात्र, दीपकसोबत एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपण उद्योजिका असल्याचे सांगितले आहे.

दीपक चहर दुखापतीमुळे फेब्रुवारीपासून क्रिकेटपासून दूर आहे. 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीची समस्या उद्भवली. यानंतर तो बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत होता. त्यातून तो सावरला. पण आयपीएलसाठी फिट होण्याच्या घाईत त्याला पाठीला दुखापत झाली. त्यानंतर तो यंदाच्या आयपीएल हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. (Deepak-Jaya Honeymoon)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT