Deepak Chahar : लग्न आटोपल्यानंतर दीपक चहरने पत्नी जया भारद्वाज विषयी व्यक्त केल्या भावना | पुढारी

Deepak Chahar : लग्न आटोपल्यानंतर दीपक चहरने पत्नी जया भारद्वाज विषयी व्यक्त केल्या भावना

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिच्याशी बुधवारी (दि १ जून)  लग्न केले. दीपक चहर आणि जया भारद्वाज अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी फतेहाबाद रोडवरिल जेपी पॅलेसमध्ये लगीनगाठ बांधली. त्यानंतर आज दीपकने सोशल मीडीयावर लग्नाचा फोटो शेअर करत पत्नीविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

दीपक चहरने फोटे शेअर करताना लिहिले आहे की, “जेव्हा मी पहिल्यांदा तुला भेटलो, तेव्हाच मला समजले होते की, तु माझ्यासाठीचं बनली आहेस. आपण प्रत्येक क्षण सोबत घालवला आणि इथून पुढेही आपण असेच सोबत राहू. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षण आहे. आम्हाला आशिर्वाद द्या.”

दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज ही दिल्लीची राहिवासी आहे. तिने आपले उच्च शिक्षण एमबीएमधून पूर्ण केले. जया सध्या दिल्लीतील एका कंपनीमध्ये कंटेट हेड म्हणून काम पाहते. तर दीपक चहरला आयपीएलच्या १५ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटी रूपये देत आपल्या संघात घेतले होते. दीपक चहर आयपीएल २०२२ च्या हंगामात जखमी झाल्याने तो खेळू शकला नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button