Dating Experiment 
Latest

Dating Experiment | ‘पेअर’ डेटिंगची जगभरात चर्चा; जाणून घ्या नेमकं ‘हे’ आहे तरी काय?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पेअर' डेटिंग या सामाजिक प्रयोगाची जगभरात चर्चा सुरू आहे. या मोहिमेत अविवाहितांना आपल्या सोशल मीडियावरील बायोमध्ये 'नासपती' म्हणजेच 'पेअर' ? इमोजी (Dating Experiment) ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यावरून असे दिसून येईल की, 'तुम्ही अविवाहित आहात आणि तुम्ही डायरेक्ट मेसेज करण्यासाठी तयार आहात'.

हा जगातील सर्वात मोठा डेटिंग प्रयोग (Dating Experiment) सध्या सुरू आहे. लाखो सिंगल व्यक्ती या प्रयोगामध्ये मोठ्या आशेने सहभागी होत आहेत. एखाद्या व्यक्तीशी चोरून जोडण्यापेक्षा नैसर्गिक पद्धती आणि इच्छेने सिंगल व्यक्ती एकमेकांशी या प्रयोगाद्वारे जोडले जात आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून ज्यांनी वास्तविक जीवनात खरच आपण सिंगल असल्याचे दाखवण्यासाठी ऑनलाईन 'पेअर' ? इमोजी चा वापर करू शकतात. तर ऑफलाईन पद्धतीने अविवाहित असल्याचे दाखवण्यासाठी हिरव्या रंगाची रिंग जारी करण्यात आली असून, ती हाताच्या बोटात घालू शकतात. जेणेकरून ते सिंगल असल्याचे ओळखले जाईल आणि या माध्यमातून अनेक सिंग व्यक्ती एकमेकांशी नैसर्गिकरित्या स्वत:च्या इच्छेने जोडले जातील; हा या मागचा उद्देश आहे.

दरम्यान, या प्रयोगाविषयी सांगताना या मोहिमेच्या (Dating Experiment) प्रवक्याने 'पिअर' या मोहिमे मागे डेटिंग ॲपची गरज कमी करणे हा उद्धेश असल्याचे स्पष्ट केले आहे. या सामाजिक प्रयोग राबवणाऱ्या कंपनीने आत्तापर्यंत पिअर रिंगचे ९१ टक्के स्टॉक विकले गेले असून, आमची ही कल्पना खूपच हिट ठरली असल्याचा दावा केला आहे.

या प्रयोगातील सहभागींनी सोशल मीडियावर पेअर' ? इमोजी ठेवणे तसेच दैनंदिन जीवनात सिंगल असल्याचे दर्शवण्यासाठी हिरवी रिंग (अंगठी) घालणे म्हणून आवश्यक आहे. यावरून आम्ही उपलब्ध असून, एकत्र येण्यास तयार आहोत हे दर्शवले जाईल. या सामाजिक मोहिमेच्या मागे डेटिंग ॲप्सचा वापर करण्यापासून परावृत्त करणे आणि लोकांना पारंपारिक मार्गाने भेटण्यास प्रवृत्त करणे हे कंपनीचे ध्येय असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT