दर्शना पवार हत्याकांड www.pudhari.news  
Latest

Darshana Pawar Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

दर्शना पवार हत्याकांडातील (Darshana Pawar Murder) संशयित आरोपी राहुल दत्तात्रेय हंडोरे (26) हा सिन्नर तालुक्यातील शहा गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. तो पुणे येथे गेल्या तीन ते चार वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने आई-वडिलांनी शेतात काबाडकष्ट करून दोन मुलांच्या शिक्षणाचा भार उचलला. कोपरगाव तालुक्यातील दर्शना पवारचे (Darshana Pawar Murder) मामा शहा येथील असून त्यामुळेच राहुल आणि दर्शना यांची ओळख झाली होती. गेल्या तीन ते चार वर्षांपासून राहुल व दर्शना हे सोबत स्पर्धा परीक्षाही देत होते. दर्शनाच्या घरचीही परिस्थिती जेमतेम असल्याने राहुल पुणे येथे तिला वेळोवेळी आर्थिक मदत करीत असल्याचेही सांगितले जाते. त्यातूनच त्यांची जवळीक वाढत गेली होती. मात्र अलीकडच्या काळात दर्शनाच्या घरचे तिच्या लग्नाचा विचार करायला लागल्याचे राहुलला खटकत असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT