अंदाधुंद गोळीबार प्रकरण : बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांची तुरूंगातून सुटका | पुढारी

अंदाधुंद गोळीबार प्रकरण : बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांची तुरूंगातून सुटका

ठाणे : पुढारी वृत्‍तसेवा बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंदाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात असलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांची अखेर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मोक्का कायद्यांतर्गत अटक झाल्यानंतर गेले आठ महिने फडके हे ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.

पनवेलचे पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून वाद होते. याच वादातून नोव्हेंबर २०२२ मध्ये अंबरनाथ एमआयडीसी परिसरात फडके गटाने राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या प्रकरणी फडके यांच्यासह एकूण ३२ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती.

या प्रकरणी ८ महिने ठाणे मध्यवर्ती कारागृहात राहिल्यानंतर अखेर फडके यांची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. जामिनासाठी फडके यांच्याकडून ५० हजारांची हमी घेण्यात आली असून, याचं उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्याचा इशारा न्यायालयानं दिला आहे. तसंच पुढील २ वर्ष दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी फडके यांना अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावावी लागणार आहे. दरम्यान, आता फडके बाहेर आल्यानंतर बैलगाडा शर्यतींना पुन्हा एकदा रंगत येणार असल्याची शर्यत प्रेमींमध्ये चर्चा आहे.

हेही वाचा :  

Back to top button