बामणोली : पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यातील पर्यटन स्थळ असलेल्या बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लब या संस्थेच्या कार्यालयाची अज्ञाताने तोडफोड करून जाळपोळ केली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे ३ ते ५ या दरम्यान असून संताप व्यक्त केला जात आहे.
कार्यालय दगडाने फोडून आतमधील लाईटचे मीटर तोडण्यात आले आहे. टेबल, सतरंज्या जाळण्यात आल्या आहेत. बोट क्लबसमोरील सर्व बोर्ड उपसून शिवसागर जलाशयाच्या पाण्यात टाकण्यात आले आहेत. या कृत्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.