देशभरात कोरोना रुग्ण संख्येमध्ये ( Corona patients ) लक्षणीय घट होताना दिसत आहे. देशातील एकुण रुग्णसंख्या ही २ लाखांपेक्षा कमी झाली आहे. दररोज आढळणार्या रुग्णांची संख्या १५ हजारांपेक्षा कमी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे १४ हजार १४६ नवे रुग्ण आढळले. मागील २२९ दिवसांमधील ही सर्वात कमी नवी कोरोना रुग्ण ( Corona patients ) संख्या ठरली आहे. दरम्यान, मागील २४ तासांमध्ये १४४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर ४१.२० लाख जणांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८.१० इतकी झाली आहे. मागील मार्च महिन्यापासूनचा विचार करता ही आकडेवारी सर्वाधिक आहे. मागील २४ तासांमध्ये १९ हजार ७८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत देशभरात ३ कोटी ३४ लाख १९ हजार ७४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सक्रीय रुग्ण संख्याही एक टक्क्यापेक्षा कमी आहे. देशात केवळ आता १ लाख ९५ हजार ८४६ रुग्ण सक्रीय आहेत. ही आकडेवारीही मागील २२० दिवसातील सर्वात कमी आहे.
आठवड्याचा कोरोना संसर्गाची टक्केवारी १.४२ इतकी आहे. ती मागील ११४ दिवसांमधील सर्वात कमी आहे. देशात आतापर्यंत ५९.०९ कोटी नागरिकांच्या कोरोना चाचणी झाल्या आहेत. आतापर्यंत ९७.६५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर मागील २४ तासांमध्ये ४१ कोटी २० लाख ७७२ जणांचे लसीकरण झाले.