पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील चेंबूर परिसरात सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरे कोसळले. यात चारजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत या घटनेतील ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. Cylinder Blast)
माहितीनुसार, चेंबूर कॅम्प ओल्ड बॅरेकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी (दि.२९) सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. यामध्ये आजूबाजूची चार ते पाच घरांचा पहिला मजला कोसळला. यात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. चेंबूर कॅम्प ओल्ड बॅरेकमध्ये सकाळी साडेसातच्या दरम्यान एका घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. सिलेंडरचा स्फोटाने घराचा पहिला मजला कोसळला. तर सिलेंडरच्या स्फोटाने आजूबाजूच्या चार ते पाच घरांचाही पहिला मजला कोसळला आहे. स्थानिकांनी तात्काळ चेंबूर पोलीस व अग्निशमन दलाच्या पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत ११ जणांना सुखरूप बाहेर काढले. यातील विकास आंभोरे (५०), अशोक आंभोरे (२७), सविता आंभोरे (४७), रोहित आंभोरे यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा