Latest

Cyber Security : लष्करात व्हॉटस् ॲपच्या माध्यमातून हेरगिरी, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
लष्करात व्हॉटस् ॲपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान सदर प्रकरणाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली. (Cyber Security ) शेजारी देशाचा संबंध हेरगिरीच्या प्रकरणात आढळून येत असल्याने हे गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही सैन्य अधिकार्‍यांनीच सायबर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय आहे.

Cyber Security : सायबर सुरक्षेचे उल्‍लंघन होत असल्‍याची शंका

काही अधिकार्‍यांकडून सायबर सुरक्षेचे उल्लंघन होत असल्याची शंका सैन्य आणि गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करुन अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित अधिकार्‍यांवरील आरोप सिध्द झाले तर त्यांच्याविरोधात कठोरातील कठोर कारवाई केली जाऊ शकते, असेही सूत्रांनी नमूद केले. एकूण प्रकरण लष्कराशी संबंधित असल्याने यासंदर्भात सावधानता बाळगली जात आहे.

पाकिस्‍तानसह चीनी हेरांचे जाळे

मागील काही काळापासून पाकिस्तानी आणि चीनी हेर भारतीय लष्करातील अधिकार्‍यांच्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लष्करातील संवेदनशील माहिती जमा करण्याच्या उद्देशाने हे कारस्थान सुरु असल्याचे गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे. काही लष्करी अधिकारी हेरांच्या जाळ्यात फसले असून त्यांच्याकडून काही माहिती बाहेर गेली असल्याचेही गुप्तचर संस्थांच्या पाहणीत आढळले असल्याचे समजते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT