Cristiano Ronaldo 
Latest

Cristiano Ronaldo : रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर 500 मिलियन फॉलोअर्स पूर्ण!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुर्तगाल सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विक्रम हे समानार्थी शब्द आहेत. आपल्या जादूई खेळाने फुटबॉलचे मैदान गाजवणा-या रोनाल्डोची सोशल मीडियावरची क्रेझ नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रोनाल्डोच्या फॉलोअर्सच्या आकड्याने 500 मिलियन (50 कोटी)चा आकडा पार करून एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. इतके फॉलोअर्स असलेला तो पहिला सुपरस्टार बनला आहे. ही संख्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॉलोअर्सपेक्षा दुप्पट आहे.

रोनाल्डोची क्रेझ ट्विटरवरही आहेत. त्याचे (Cristiano Ronaldo) ट्विटरवर 105 मिलियन फॉलोअर्स आहेत. रोनाल्डो आणि मेस्सी सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी कतारमध्ये पोहचले आहेत. पोर्तुगालचा सुपरस्टार रोनाल्डोने फुटबॉलमधील अनेक विक्रम आपल्या नावावर करत मोठे यश संपादन केले आहे. मैदानाबाहेरही तो विक्रम करण्यासाठी ओळखला जातो. आता त्यांने मैदानाबाहेरील आणखी एका विक्रमला गवसणी घातली आहे. तो इंस्टाग्रामवर 500 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला व्यक्ती बनला आहे.

विराट कोहली सातव्या स्थानावर

रोनाल्डोनंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी फॉलोअर्सच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे इंन्टाग्रामवर 376 मिलियन फॉल फॉलोअर्स आहेत. त्यानंतर फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेची मॉडेल कायली जेनरचा क्रमांक लागतो. तिचे 372 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमेरिकेची गायिका सेलेना गोमेझ चौथ्या आणि अभिनेता ड्वेन जॉन्सन पाचव्या स्थानावर आहे. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली 224 मिलियन फॉलोअर्ससह यादीत सातव्या स्थानावर आहे.

मेस्सी-रोनाल्डो यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर

यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वांच्या नजरा लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ पोर्तुगाल यांच्यावर आहेत. या दोन्ही खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक मानला जात आहे. अशा स्थितीत या शतकातील हे दोन महान फुटबॉलपटू आपापल्या संघांना चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतील.

मेस्सी-रोनाल्डोने केला फोटो शेअर

विश्वचषकापूर्वी एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा फोटो चाहत्यांना खूप आवडला. त्यांनी याला आयकॉनिक पिक्चर म्हटले. यासोबतच याला 'पिक्चर ऑफ द सेंच्युरी' (या शतकातील सर्वात प्रेक्षणीय चित्र) असेही म्हटले गेले आहे. वास्तविक या छायाचित्रात मेस्सी आणि रोनाल्डो बुद्धिबळ खेळताना दिसत आहेत. हे छायाचित्र रोनाल्डो आणि मेस्सी यांनीही आपाअपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT