Dwayne Bravo : ड्वेन ब्राव्होला 'पुष्पा' स्टाईलची लागण! डान्सचा व्हिडीओ व्हायरल (Video) 
Latest

Dwayne Bravo : ड्वेन ब्राव्होला ‘पुष्पा’ स्टाईलची लागण! डान्सचा Video व्हायरल

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार अल्लू अर्जुन याचा 'पुष्पा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यातील श्रीवल्ली गाण तर प्रेक्षकांसह सेलिब्रेटी , क्रिकेटपटू यांनी डोक्यावर घेतले आहे. या गाण्यातील अभिनेता अल्लू अर्जुनची हुक स्टेपने तर कहर केला आहे. ही डान्स स्टेप क्रिकेटरसिकांनाही भूरळ घालत आहे. ही डान्स स्टेप फॉलो करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विंडीजच्या ड्वेन ब्राव्होचेही (Dwayne Bravo) नाव जोडले गेले आहे. बांगलादेश प्रीमियर लीग सामन्यात ब्राव्होने विकेट घेतल्यानंतर श्रीवल्ली गाण्यातील हुक स्टेप्स करत आनंद साजरा केला. या स्पर्धेत ब्राव्हो फॉर्च्युन बरीशालकडून खेळत आहे.

सोमवारी कोमिल्ला व्हिक्टोरियन्सविरुद्धच्या सामन्यात ब्राव्हो (Dwayne Bravo) १८ वे षटक फेकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फलंदाज महिदुल इस्लामने ब्राव्होने फेकलेला चेंडू मैदानाबाहेर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यात महिदुल अपयशी ठरला. त्याने फटकावलेला चेंडू थेट क्षेत्ररक्षकाकडे गेला. ही विकेट पटकावल्यानंतर ब्राव्होला अत्यानंद झाला आणि त्याने पुष्पा चित्रपटाच्या श्रीवल्ली गाण्यातील हुक स्टेप करून सेलिब्रेशन केले. विकेट घेतल्या नंतरच्या त्याचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्रावोचा हा व्हिडिओ आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सनेही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ब्राव्हो (Dwayne Bravo)चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. ब्राव्होच्या आधी भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेविड वॉर्नरने यांनाही श्रीवल्ली गाण्यातील हुक स्टेपने भूरळ घातली होती. त्यांनी या गाण्यावर परर्फॉर्म करून आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. त्यांना चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे.

अष्टपैलू ब्राव्होने (Dwayne Bravo) गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2012 आणि 2016 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा तो सदस्य होता. त्याने 40 कसोटी, 164 एकदिवसीय आणि 91 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान ब्राव्होने 6421 धावा केल्या आणि 363 विकेट्स घेतल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT