Rohit Sharma : रोहित ‘या’ खेळाडूला संघातून बाहेर काढण्याची दाट शक्यता! | पुढारी

Rohit Sharma : रोहित ‘या’ खेळाडूला संघातून बाहेर काढण्याची दाट शक्यता!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला आहे. आता भारताला ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून पुनरागमन करू शकतो आणि तो येताच एका युवा खेळाडूला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. श्रेयस अय्यर (shreyas iyer) असे या खेळाडूचे नाव असून त्याला एकदिवसीय संघात संधी मिळणार की नाही हा येणारा काळच ठरवेल.

श्रेयस अय्यरच बाहेर होण्याची शक्यता का?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरला (shreyas iyer) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली. पण, त्याने निराशा केली. श्रेयसने तिन्ही सामन्यात अनुक्रमे १७, ११, २६ धावा केल्या. मधल्या फळीत तो धमाकेदार प्रदर्शन करेल अशी एक अपेक्षा होती. संघव्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला. पण श्रेयस काही खास प्रदर्शन करू शकला नाही. आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे कुणातरी प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर जावे लागणार आहे. त्यातच श्रेयस अय्यरला आता कट्ट्यावर बसावे लागणार असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

श्रेयस अय्यर वनडे करिअर संपणार? (shreyas iyer)

श्रेयस अय्यरच्या द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील फ्लॉप कामगिरीने एक गोष्ट निश्चित केली की तो पाचव्या क्रमांकावर येऊन फलंदाजीत काही खास प्रदर्शन लरू शकत नाही. कारण, पाचव्या क्रमांकावर अशा फलंदाजाची गरज आहे, जो संघाला शेवटपर्यंत टिकवून ठेवतो आणि विजयाच्या जवळ नेतो आणि श्रेयस अय्यरला हे जमलेले नाही. तो यता अयशस्वी ठरला आहे. श्रेयस अय्यरला वेस्ट इंडिजविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून भारतात सुरू होणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून वगळले जाऊ शकते, कारण त्याची कामगिरी खूपच खराब झाली आहे. (Rohit Sharma)

या क्रिकेटपटूला मिळावी संधी…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला (suryakumar yadav) संधी दिली जाऊ शकते. सुर्यामध्ये एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमारची जागा निश्चित मानली जात आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातो. त्याच्या सारख्या प्रतिभावान फलंदाजाला मैदानात अनेक शॉट्स खेळून धावा काढण्याची कला अवगत आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Back to top button