Latest

Shane Warne : ‘या’ कोरोना लसीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू? जाणून घ्या डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या मृत्यूचे (Shane Warne Death) प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याच्या मृत्यूशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला असून त्यात मृत्यूचे कारण कोविड-19 ची लस असू शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे.

शेन वॉर्न (Shane Warne) थायलंड टूरवर गेलेला असताना 4 मार्च 2022 मध्ये तो त्याच्या हॉटेल रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. ज्यावेळी त्याला रूग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्याला मृत घोषित केले. त्यावेळी वॉर्नच्या मृत्यूचे (Shane Warne Death) कारण समोर आले नाही. मात्र आता तब्बल एका वर्षानंतर शेन वॉर्नच्या (Shane Warne) याच्या निधनाच्या कारणाचा खुलासा झाला आहे.

युकेमधील कार्डिओलॉजिस्ट डॉ. असीम मल्होत्रा ​​आणि ऑस्ट्रेलियन मेडिकल प्रोफेशनल्स सोसायटी (AMPS)चे अध्यक्ष डॉ. ख्रिस नील यांनी याबाबत खुलासा केला. त्यांच्या अहवालानुसार, 'डॉक्टर मल्होत्रा ​​म्हणाले, 'वयाच्या 52 व्या वर्षी वॉर्नची जीवनशैली फारशी आरोग्यदायी नव्हती हे सर्वांनाच माहीत आहे. तो धूम्रपान करत असे आणि त्याचे वजनही जास्त होते. त्यातच त्याने मृत्यूच्या 9 महिने आधी फायझरची COVID mRNA ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. या लसीमुळे लस हृदयाशी संबंधीत आजार वाढतात असे समोर आले होते. या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर धमन्यांमधील काही सौम्य प्लेक्स झपाट्याने वाढले असावेत. त्यामुळेच वॉर्नला हृदयविकाराचा त्रास झाला व त्यातूनच त्याचा मृत्यू झाला असावा,' असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू दिमित्री मस्करेन्हास या अहवाला वर प्रतिक्रिया देत म्हटले की, शेन माझा चांगला मित्र होता. त्याचा मृत्यू पूर्णपणे टाळता येण्याजोगा होता. जर त्याने कोविडची लस घेतली नसती तर आज तो जिवंत असता. डॉक्टरांच्या अहवालातील माहिती वाचून मला धक्का बसला आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT