Latest

Cough syrup : गाम्बियातील ‘त्या’ 66 मुलांच्या मृत्यूला भारतीय कफ सिरप जबाबदार नाही, WHO ने हडबडीत संबंध जोडला – डीसीजीआय डॉ.सोमानी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Cough syrup : गाम्बियातील लहान मुलांच्या मृत्यूंसाठी भारतीय कफ सिरप जबाबदार नाही, विश्व स्वास्थ्य संघटनेने घाईगडबडीत अपरिपक्वपणे भारतीय कफ सिरपशी याचा संबंध जोडला. यामुळे जगभरात भारतीय औषधांच्या बाबत प्रतिकूल प्रभाव पडला आहे, असे भारताचे औषधी महानियंत्रक (डीसीजीआई) डॉ. वी. जी. सोमानी यांनी विश्व स्वास्थ संघटना (WHO) ला सांगितले आहे.

Cough syrup : WHO चे निदेशक डॉ. रोजेरियो गैस्पर यांना भारताचे औषधी महानियंत्रक डॉ. वी.जी. सोमानी यांनी नुकतेच एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, WHO ने हडबडीत भारतीतल कफ सिरपचा संबंध गॅम्बियातील लहान मुलांच्या मृत्यूशी जोडला. ज्यामुळे भारतीय औषधांच्या गुणवत्तेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मत बनवले गेले.

डॉ. सोमानी म्हणाले की माधम्यांच्या अनुसार गाम्बियाने म्हटले आहे की कफ सिरप घेतल्यानंतर मुलांचा मृत्यू झाला या दोन घटनांमध्ये कोणताही प्रत्यक्ष संबंध अद्याप स्थापित केला गेला नाही तसेच ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यांनी हे कफ सिरप घेतलेच नव्हते. (Cough syrup )

पत्रात, सोमानी यांनी पुढे म्हटले आहे, गाम्बियात ज्या 66 मुलांच्या मृत्यूसाठी भारतातील चार कफ सिरपचा (Cough syrup) संबंध जोडला गेला त्यांच्या नमुन्यांचे परीक्षण सरकारी प्रयोगशाळेत केले गेले आहे. मात्र, हे सर्व कफ सिरप नियमांच्या अनुरूप आहेत. मेडेन फार्माचे खोकल्यावरील औषध गुणवत्ते वर खरे उतरले आहे. सरकारने गुरुवारी संसदेत देखील याची माहिती दिली.

केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संगठन (सीडीएससीओ) ने राज्य औषधी नियंत्रक, हरियाणाच्या सहयोगाने सोनीपतच्या कुंडली येथे मेडेन फार्मास्युटिकल्सची संयुक्त रित्या पडताळणी केली. या पडताळणीचा उद्देश गाम्बियात झालेल्या त्या 66 मुलांच्या मृत्यूचा संबंध कफ सिरपशी जोडला गेला यामध्ये काही तथ्य आहे का हे माहित करून घेणे हा होता. (Cough syrup)

डीसीजीआय ने डब्ल्यूएचओ सह संपूर्ण सहयोग करण्याचे पुन्हा म्हटले आहे. तसेच सीडीएससीओने या पूर्वीच डब्ल्यूएचओला उपलब्ध असलेले विविरण नियमितपणे शेअर केले आहेत. तसेच औषधे आणि सौंदर्य प्रसाधने गुणवत्ता नियंत्रणमध्ये उच्चतम मानकांना राखणे याविषयी कडक निगरानी आणि निरीक्षण करण्यासाठी भारत प्रतिबद्ध आहे, असे म्हटले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT