पुढारी ऑनलाइन डेस्क : साबुदाण्याची खिडची खाऊन कंटाळा आला आहे. मग खिचडी ऐवजी साबुदाण्याची पुरी बनवा. अतिशय साध्या सोप्या आणि झटपट होणा-या.
साहित्य : साबुदाण्याचे पीठ दोन वाट्या, दोन उकडलेले बटाटे, चवीनुसार सैंधा मीठ, तूप किंवा शेंगदाणा तेल
कृती : साबुदाण्याचे पीठात उकडलेले बटाटे चांगले कुस्करून टाका. त्यात चवीनुसार मीठ टाका. हे मिश्रण मळून घ्या. मिश्रण घट्ट मळावे. घट्ट मळल्याने पुरी छान होते. मळून झाल्यानंतर गोळे बनवून घ्या. त्याच्या छोट्या मध्यम आकाराच्या पु-या लाटून घ्या. आता कढईत तूप टाका तूप गरम झाले की लाटलेल्या पु-या तळून काढा…
दह्याची चटणी
साहित्य – एक वाटी दही, चार मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, काळीमिरी, फोडणीसाठी तेल किंवा तूप
कृती – तेल किंवा तूप कढईमध्ये गरम करून घ्या. त्यात वाटलेली हिरवी मिरची टाका, नंतर दही आणि शेंगदाण्याचे कूट टाका आणि मिश्रण एकजीव करून थोडावेळ झाकण ठेवून वाफवून घ्या. चवीनुसार मीठ टाका. दह्याची चटणी तयार आहे.
पुरी सोबत चटणी सर्व करा.