पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील बलुचिस्तान ( Balochistan ) प्रांतात आज ( दि. १३) बंडखोरांनी चिनी अभियंत्यांच्या ताप्यावर हल्ला केला, असे वृत्त 'द बलुचिस्तान पोस्ट'ने दिले आहे. ग्वादर शहरामध्ये हा हल्ला झाला असून, गोळीबार सुरु असून, येथील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याचेही या वृत्तात म्हटलं आहे.
चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्ल्याला सरकारी अधिकाऱ्यांनीही पुष्टी दिली आहे, असे त्यात म्हटले आहे. चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला आज सकाळी ९.३०च्या सुमारास झाला. सुमारे दोन तास चकमक सुरू होती, असे द बलुचिस्तान पोस्टने मीडिया रिलीझचा हवाला देत वृत्त दिले आहे. या घटनेची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. शहरातील प्रवेश आणि बाहेर जाण्यास प्रतिबंधित करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात कराची विद्यापीठातील चीन-निर्मित कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसवर बुरखा घातलेल्या बलूच महिला आत्मघाती हल्लेखोराने तीन चिनी नागरिकांसह (शिक्षक) चार जण ठार केले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.जुलै २०२१ मध्ये, वायव्य पाकिस्तानमध्ये अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. नऊ चिनी कामगारांसह १३ जणांचा मृत्यू झाला हाेता. पाकिस्तानने चिनी कामगारांच्या कुटुंबीयांना लाखोंची भरपाई दिली हाेती. या हल्ल्याच्या चौकशीसाठी चीनने आपले पथक पाठवले होते.
हेही वाचा :