bigg boss marathi 4 
Latest

बिग बॉस मराठी – 4 : घराच्या आठवणींमुळे अमृता धोंगडेला अश्रू अनावर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काही दिवसांनंतर घरच्या सदस्यांची आठवण येणे साहजिकच आहे. कधी कधी त्यांना एकटेदेखील वाटू शकते. अमृतालादेखील अश्रू अनावर झाले आणि तिला रडू कोसळले. आणि म्हणूनच किरण माने तिची समजूत काढताना दिसले. प्रसाद तिला हसवण्याचा प्रयत्न करताना दिसला. प्रसादने अमृताला विचारले, "आम्ही काय घरातले नाही का ? का रडतेस? नाही म्हणजे जस्ट विचारतो आहे. नसू शकतो कदाचित. अमृताचे म्हणणे आहे इथे सगळेच खेळायला आले आहेत. किरण माने म्हणाले, मी काय काय सोसलं असेल काल.

प्रसाद म्हणाला, टास्क हा पण आहे ना की, तुला खरंच ओळखायचे आहे कोण आपले आहेत? कोण? ते चुकलं ना की ही आठवण जोरात येते. पहिल्या दिवशी माझ्या डोक्यात फक्त तेच सुरु होतं. किरण म्हणाले, ते चुकलं ना की गणित चुकतं. काही लोकं आपल्या जवळ येतात ना ते आपला प्रभाव कमी करायला येतात आणि काही लोकं आपला प्रभाव वाढवायला येतात. काही माणसांनी याला (विकासाला) विकून खाल्लं असतं की नाही, एकटा असता तर? निगेटिव्ह असो वा पॉझिटीव्ह आला तो फोकसमध्ये काल. त्यांना हे कळत नाही आपला माणूसच आपल्याला झाकतो आहे. विकास आणि मी जे जगतो आहे ते खरं जगतो आहे."

bigg boss marathi 4

बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे. किचनमध्ये बटाटा, काकडी सोलायला जे सोलणं ठेवले आहे ते अक्षयच्या मते वापरायला अत्यंत कठीण आहे. अमृता देशमुख हिने त्याला ते कसे वापरावे हे देखील शिकवले. पण तरी त्याची बिग बॉस यांना विनंती आहे, "बिग बॉस माझं हे म्हणणं आहे technically हे भले हे स्ट्रॉंग असेल, पण आपल्या जुन्या techniques चं सोलणं द्यावे… हे खूपचं अवजड आणि अवघड आहे".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT