Latest

Gold Jewellery : ग्राहक आता स्वतः तपासू शकतात सोन्याची शुद्धता, भारतीय मानक ब्युरोने दिली महत्वाची माहिती

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोने खरेदी करताना सोन्याची शुद्धता महत्वाची असते. त्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर (Gold Jewellery) हॉलमार्किंग (hallmarked jewellery) अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे ग्राहक आता हॉलमार्किंग केंद्रांवर (Hallmarking Centres) हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांची तपासणी करुन घेऊ शकतात.

हॉलमार्किंग अनिवार्य केल्यानंतर दररोज ३ लाख सोन्याच्या वस्तू HUID द्वारे हॉलमार्क केल्या जात आहेत. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने आता सामान्य ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांची (Gold Jewellery) शुद्धता तपासून घेण्यासाठी मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्रे (AHCs) उपलब्ध केली आहेत. AHC प्राधान्याने सामान्य ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करुन अहवाल देईल. ग्राहकांना दिलेला चाचणी अहवाल ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांच्या शुद्धतेबद्दल खात्री देतो. तसेच ग्राहकांना त्याच्याकडे असलेले दागिने विकायचे असतील तर त्याचा उपयोग होईल. यासाठी सोन्याच्या ४ दागिन्यांच्या तपासणीसाठी २०० रुपये शुल्क आकारले जाईल. ५ किंवा त्याहून अधिक वस्तूंसाठी प्रति वस्तू ४५ रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सराफाने सोन्याचे दागिने बीआयएस हॉलमार्कशिवाय विकल्यास संबंधित दुकानदाराला दागिन्याच्या किमतीच्या पाच पट दंड आकारला जाऊ शकतो. अथवा एक वर्षांपर्यंत तुरुंगवासदेखील होऊ शकतो. सोने खरेदी करताना सामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने बीआयएस हॉलमार्क बंधनकारक केला आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT