Congress president Mallikarjun Kharge 
Latest

Congress president : मल्लिकार्जुन खर्गे आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) बुधवारी (दि. २६) दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात या पदाचा कार्यभार (Congress president) स्वीकारतील. सर्व काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सीएलपी नेते, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि एआयसीसीच्या इतर पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. वरील सर्व संबंधितांना कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी निमंत्रण पाठवले आहे.

आज सकाळी (दि.२६) मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजघाटावर जावून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

Congress president : २४ वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष 

खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शशी थरूर (Shashi Tharoor) यांना पक्षाच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीत मोठ्या फरकाने पराभूत केले. २४ वर्षांनंतर कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळवणारे ते पहिले गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती आहेत. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात खर्गे यांना राष्ट्रपतीपदाच्या लढतीत ७,८९७ मते मिळाली तर त्यांचे विरोधक शशी थरूर यांना १,०७२ मते मिळाली. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.

हेही वाचा?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT