बर्लिन : तुम्ही शंख फुंकला (conch shell Blowing) आहे का? जर नसेल तर शिकून घ्या. कारण याचे केवळ आध्यात्मिकच नाही तर वैज्ञानिक फायदेही आहेत. शंखनादाने केवळ वातावरणच शुद्ध होत नाही तर अनेक आजारही बरे होतात.
ज्या भागात नियमितपणे शंखनाद (conch shell Blowing) केला जातो, तेथील वातावरणातील हानीकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात असे बर्लिन विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.
शंखनादाचे (conch shell Blowing) विशिष्ट तरंग असतात. शंखनादाचा आपले शरीर, मन आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. थायरॉईड आणि अस्थमाच्या रुग्णांसाठी हा ध्वनी लाभदायी आहे. थायरॉईडमध्ये हार्मोन सिक्रेशनवर नियंत्रण ठेवले जाते. शंख फुंकणे आणि श्वासोच्छवासानेे फुफ्फुसांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. यामुळे फुफ्फुस फुलते. नासाच्या संशोधनात असेही स्पष्ट झाले आहे की, शंखातून निघणारा आवाज खगोलीय ऊर्जेसारखा आहे. त्यामुळे जंतू नष्ट होतात. नवीन ऊर्जेचा संचार होतो. सूर्याची किरणे सकाळी आणि संध्याकाळी प्रखर नसतात.
या दरम्यान शंख फुंकण्याचा (conch shell Blowing) विधायक परिणाम होतो, असेही संशोधनाअंती दिसून आले आहे. जेव्हा तुम्ही शंख कानाजवळ घेऊन लक्षपूर्वक ऐकता तेव्हा तुम्हाला समुद्राच्या लाटा हळूहळू येत असल्यासारखा आवाज ऐकू येतो. वास्तविक, पृथ्वीची वैश्विक ऊर्जा किंवा नैसर्गिक कंपने शंखात प्रवेश केल्यानंतर मॅग्निफाईड होतात. शंखातून ध्वनी कंपने होतात. त्यामुळे वातावरणात पसरणारे प्रदूषणही कमी होते. शंख फुंकल्याने मनोवैज्ञानिक स्पंदने निर्माण होतात ज्यामुळे व्यक्तीमध्ये द़ृढनिश्चय आणि इच्छाशक्ती वाढते.
हेही वाचा :