पुढारी ऑनलाइन डेस्क : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये ज्युडो स्पर्धेत भारताची ज्युडोका तुलिका मान हीने 78 किलो वजनगटाच्या लढतीत स्कॉटलंडच्या सारा अॅडलिंग्टन हीच्या सोबतच्या संघर्षपूर्ण लढतीत रौप्य पदक मिळवून दिले.
तुलिकाने दिवसभरात आधी दोन लढतीत विजय मिळवत उत्तम कामगिरी केली. त्यानंतर फायनलमध्ये तिने सारासोबत संघर्षपूर्ण लढत दिली. मात्र अखेरच्या काही सेकंदात तिला माघार घेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यानंतर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली…
मी माझ्या कामगिरीवर खूश नाही पण आता काही करता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया योजना सुरू केल्याबद्दल त्यांच्या मदतीबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. मी हे पदक माझ्या आईला आणि प्रशिक्षकाला समर्पित करते, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया तुलिकाने व्यक्त केली.
मात्र, तुलिकाची ही कामगिरी देखील महत्वाची आहे. तिच्यामुळे बर्मिंगहॅम येथे होत असलेल्या स्पर्धेत ज्युडोमध्ये तिसरे पदक भारताच्या खात्यात मिळवता आले.
हे ही वाचा