Commonwealth Games India : लवप्रीत सिंहने जिंकले ब्रांझ पदक! भारताची वेटलिफ्टिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी | पुढारी

Commonwealth Games India : लवप्रीत सिंहने जिंकले ब्रांझ पदक! भारताची वेटलिफ्टिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय वेटलिफ्टर खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) लवप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात ब्रांझ पदक जिंकून भारताच्या पदतालिकेत 14 व्या पदकाची नोंद केली. लवप्रीतची राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. वेटलिफ्टिंगमधील भारताची ही संयुक्त सर्वोत्तम कामगिरी आहे. या खेळ प्रकारातून भारताला नऊ पदके जिंकण्यात यश आले आहे. 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारताने या खेळात नऊ पदके जिंकली होती.

लवप्रीतने 355 किलो वजन उचलून ब्रांझ पदकाची लमाई केली. त्याने स्नॅच राऊंडमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये 192 किलो वजन उचलले. कॅमेरूनच्या ज्युनियर पेरिलेक्सने 361 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी समोआच्या जॅक हिटिला ओपालॉगने 358 किलो वजनासह रौप्यपदक पटकावले.

आणखी वाचा : 

Back to top button