ठाणे; पुढारी ऑनलाईन : दारु पिऊन टुल्ल असणाऱ्या रिक्षा चालकाने २१ वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. यानंतर त्याने तिला जबरदस्तीने रिक्षातून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विरोध करणाऱ्या पीडित विद्यार्थिनीला नराधम रिक्षा चालकाने चक्क ५०० मीटर पर्यंत फरफट नेले. ही घटना शुक्रवारी पहाटे ६.३० च्या सुमारास ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसी टिव्हीमध्ये कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल झाला आहे. दरम्यान २४ तासाच्या आता या रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. (College Girl Molested)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थिनी सकाळी महाविद्यालयाकडे जात होते. यावेळी दारुच्या नशेत असणाऱ्या रिक्षा चालकाने तिच्यावर घाणेरडे कमेंट केले. याला तरुणीने विरोध करताच त्याने रस्त्यात तिची छेडछाड करत तिचा विनयभंग केला. शिवाय तिला रिक्षातून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नराधमाच्या हातून सुटका करुन घेण्यासाठी तरुणीने स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रिक्षाचालकाने आपली ॲटो सुरु करुन तिला तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. सर्व घटनाचे दृष्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे. तसेच सदरची घटना समाज माध्यमातून वायरल झाली आहे. (College Girl Molested)
घटनेनंतर परिसरात नागरिकांचा उद्रेक पहायला मिळाला. जेव्हा घटना घडली तेव्हा या परिसरातील नगरसेवक संजय वाघुले याच परिसरात होते. त्यांनी या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पहात त्यांनी पोलिसांना पाचारण करत त्यांचकडे ते सुपर्द केले. दरम्यान पीडित विद्यार्थिनीने देखिल याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ताबडतोब विविध पथके संबधीत रिक्षा चाकलाच्या शोधासाठी रवाना केले. सीसीटिव्ही फुटेजमुळे रिक्षाचा नंबर मिळाला होता. यावरुन पोलिसांनी अवघ्या २४ तासामध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या.
अधिक वाचा :