Coin 
Latest

Coin : पोटातून काढली तब्बल १८७ नाणी; स्किझोफ्रेनिया आजाराने त्रस्त

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कर्नाटक राज्यातील एका रुग्णाच्या पोटातून तब्बल १८७ नाणी (Coin) काढण्यात आली आहेत. त्याला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होवू लागला. चेकअपसाठी रुग्णालयात गेला असता चेकअपअंती लक्षात आलं की त्याच्या पोटात नाणी आहेत. तो एका मानसिक विकाराने त्रस्त होता. गेल्या २ ते ३ महिन्यापासून नाणी गिळत होता. आता त्याची तब्येत स्थिर आहे.

माहितीनुसार हा रुग्ण कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगूर शहरातील रहिवाशी आहे. त्याच नाव  दयमप्पा हरिजन (वय.५८) आहे. त्याला स्किझोफ्रेनिया आजाराने त्रस्त आहेत. काही दिवसांपासून  पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होवू लागला. म्हणून त्यांचा मुलगा रवी कुमार याने २६ नोव्हेंबर रोजी दयमप्पा यांना बागलकोट येथील  एच. एस. के. रुग्णालयात दाखल केले.  डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यांची एंडोस्कोपी करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल १८७ नाणी त्यांच्या पोटातून काढण्यात आली. ही नाणी १, २ आणि ५ रुपयांची होती. या नाण्यांच एकूण वजन १.२ किलो आहे.

आव्हानात्मक शस्त्रक्रिया

हनागल श्री कुमारेश्वर हॉस्पिटलचे डॉ. ईश्वर कलबुर्गी म्हणाले, ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती, कारण रुग्णाचं पोट फुगलं होतं. रुग्णाची सीआरच्या माध्यमातून नाणी शोधली आणि नाणी काढण्यात आली. आता रुग्णाची तब्येत स्थिर आहे.

Coin : स्किझोफ्रेनिया नावाचा आजार

रुग्ण दयमप्पा हे स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराने त्रस्त आहेत.  मानसिकरित्या अस्वस्थ होते. दयमप्पा यांच्या मुलाच्या माहितीनुसार दयमप्पा हे दररोजची कामे करत. ते नाणी गिळतात हे कधी निदर्शनास आलं नाही आणि त्यांनी कधी सांगितलही नाही. पण जेव्हा त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि उलट्या होवू लागल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय चाचण्याअंती हे लक्षात आलं की त्यांच्या पोटात नाणी आहेत.

स्किझोफ्रेनिया म्हणजे काय

स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) आजार हा मानसिक आजार आहे. याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होत असतो. या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीची गोंधळलेली विचार पद्धती असते. वर्तनात बदल होत असतो. हा आजार गंभीर असला तरी योग्य आणि लवकर उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT