Latest

जीनपिंग-पुतिन नियोजित भेटीने वाढवले जगाचे टेन्शन; ‘इस्रायल-हमास’ प्रश्नी अमेरिकेला शह? Putin – Xi Jinping on Israel – Hamas War

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनचे नेते क्षी जीनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन या आठवड्यात बीजिंगमध्ये भेटणार आहेत. या दोन्ही देशांनी इस्रायल आणि हमास संघर्षात इस्रायलवर टीका करत युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संदर्भात जीनपिंग आणि पुतिन काय भूमिका घेतात याकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. (Putin – Xi Jinping on Israel – Hamas War)

सध्या अमेरिका आणि युरोपमधील राष्ट्रं ही इस्रायलच्या बाजूने आहेत. त्यामुळे चीन आणि रशिया पॅलेस्टाईनची बाजू घेऊन पर्यायी जागतिक नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सीएनएनने म्हटले आहे. चीनच्या राजधानातील २०२२मध्ये पुतिन आणि जीनपिंग यांची भेट झाली होती, त्यानंतर फक्त तीन आठवड्यांत रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बुधवारी इस्रायलला भेट देणार आहेत. हे लक्षात पुतिन आणि जीनपिंग यांची भेटही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बीजिंगमध्ये बेल्ट अँड रोड प्रोजेक्टसंदर्भात परिषद होत आहे, यासाठी पुतिन प्रमुख पाहुणे आहेत. यानंतर ते पुतिन यांची भेट घेतील.

शांतीसाठी प्रयत्न की अमेरिकेविरुद्ध आघाडी Putin – Xi Jinping on Israel – Hamas War

रशियाच्या संयुक्त राष्ट्र संघातील राजदूतांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धविरामची मागणी केली आहे. तर दुसरीकडे चीनने अधिकृतरीत्या इस्रायल स्वसंरक्षणाच्या अधिकाराच्या पलीकडे जात आहे, अशी भूमिका घेतली आहे. तसेच चीनने गरज पडली तर मध्यपूर्वेत दूत पाठवू असेही म्हटले आहे. चीनने हल्ल्यांचा उल्लेख केला असला तरी हमासचा थेट उल्लेख केलेला नाही, हे विशेष..

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT