Latest

Pujara Cheteshwar Pujara : कसोटी चॅम्पियनशिपच्या अपयशाचे खापर पुजाराच्या डोक्यावर

Shambhuraj Pachindre
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाने भारताला सलग दुसर्‍यांदा हुलकावणी दिली. नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यानंतर अनुभवी फलंदाज पुजाराची कारकीर्द संकटात सापडल्याची चर्चा होती. त्याला अगामी विंडीज दौर्‍यातून वगळले जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हाच अंदाज बीसीसीआयच्या निवड समितीने खरा करून दाखवला आहे. (Cheteshwar Pujara)
शुक्रवारी जेव्हा बीसीसीआयने संघाची घोषणा केली तेव्हा त्यात पुजाराचे नाव दिसले नाही. उलट ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. दोन महिने इंग्लंडमध्ये कौंटी सामने खेळूनही डब्ल्यूटीसी फायनलच्या दोन्ही डावांमध्ये पुजाराने निराशाजनक कामगिरी केली. त्याने दोन्ही डावांत अनुक्रमे केवळ 14 आणि 27 धावा केल्या. यापूर्वीच्या अनेक मालिकांमध्येही त्याची बॅट चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरत आली आहे. अशा परिस्थितीत पुजाराचे कसोटी करिअर संकटात सापडले होते. अखेर निवडकर्त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवून त्याच्या जागी नव्या फलंदाजांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Cheteshwar Pujara)

पुजाराने 103 कसोटी सामने खेळले

चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी एप्रिलपासून कौंटी क्रिकेट खेळत होता. मात्र, असे असूनही भारतासाठी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही डावांत तो अपयशी ठरला. पुजाराला पहिल्या डावात 14 तर दुसर्‍या डावात केवळ 27 धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला कुठेतरी पराभवाला सामोरे जावे लागले. 35 वर्षीय पुजाराने आतापर्यंत भारतासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये 7195 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 19 शतकांचा समावेश आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT