Chittah Died 
Latest

Cheetah died : कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू; ४ महिन्यात आठव्या चित्त्याचा मृत्यू

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Cheetah died : कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी पहाटे आफ्रिकेतून आणलेला आणखी एक चित्ता मृतावस्थेत आढळून आला. सूरज असे या चित्त्याचे नाव आहे. बिझनेस स्टँडर्डच्या माहितीनुसार, चित्ता सूरजच्या मृत्यूनंतर गेल्या चार महिन्यात आतापर्यंत एकूण ८ चित्ते दगावले आहेत. मार्चनंतरचा या आठव्या चित्त्याचा मृत्यू आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याआधी, गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून स्थलांतरित झालेल्या 20 पैकी पाच चित्ते आणि भारतात जन्मलेल्या तीन शावकांचा मृत्यू झाला होता. देशातील प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित केल्यानंतर सात दशकांनंतर चित्त्यांचे भारतात पुर्प्रस्थापन करण्यात आले. भारत सरकारने 1952 मध्ये चित्ता अधिकृतपणे नामशेष झाल्याचे घोषित केले होते. 1948 मध्ये देशात चित्त्याची शेवटची नोंद झाली होती, जेव्हा छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील सालच्या जंगलात तीन चित्त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

आठव्या चित्ताच्या मृत्यूच्या वृत्तावर मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह म्हणाले, "मला माहिती मिळाली आहे, पण पोस्टमॉर्टम केले जात आहे. त्यानंतरच मी काही सांगू शकेन. हे वन्य प्राण्यांमध्ये सामान्य आहे. आम्ही यामध्ये शावकांचा समावेश करत नाहीत परंतु उर्वरित (मृत्यू) हे अन्न किंवा वीण यावरून झालेल्या भांडणामुळे झाले आहेत. हे वन्य प्राण्यांमध्ये सामान्य आहे… आमच्या मते हा तिसरा किंवा चौथा चित्ता असेल आम्ही पिल्ले मोजत नाही. कारण ते वाचणार नाहीत असे वाटत होते. भारत सरकारची एक टीम आली आहे आणि आम्ही आफ्रिकन टीमशीही संपर्क करत आहोत…"

फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, चित्ता पुन्हा आणून भारताला जैवविविधतेचा घटक पुनर्संचयित करण्याची संधी आहे. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारतामध्ये आफ्रिकन चित्तांसाठी अधिवास किंवा शिकार प्रजाती नाहीत आणि प्रकल्प गवताळ प्रदेश संवर्धनाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही. Cheetah died

जूनमध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले होते की, चित्त्यांच्या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी सरकार घेते. "हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे आणि आम्हाला मृत्यूचा अंदाज होता," असे यादव यांनी एनडीटीव्हीने सांगितले. "भारतात येण्यापूर्वीच एक चित्ता आजारी होता. आम्ही इतर दोन [प्रौढ] चित्त्यांच्या मृत्यूची कारणे दिली आहेत," असे ते म्हणाले. Cheetah died

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT