Latest

कर्नाटकातील स्वस्त पेट्रोल-डिझेलमुळे सीमाभागातील पंप मालकांना फटका

अविनाश सुतार

अब्दुल लाट; अंकुश पाटील : महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७ ते ८ रुपयांनी स्वस्त असल्याने सीमाभागातील कर्नाटकच्या हद्दीतील माणकापूर, बोरंगाव व पाचवा मैल येथील पेट्रोल पंपावर गर्दी पहायला मिळत आहे. तर याचा सीमावर्ती महाराष्ट्रातील पंप मालकांना मोठा फटका बसत आहे.

महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कर्नाटक राज्यापेक्षा जास्त आहेत, वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत येऊ लागले आहेत. दुचाकी, चारचाकीधारक सुद्धा पेट्रोल पंपावर दर पाहून आपल्या भुवया उंचावत आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या बरोबरच व्यावसायिक, कामगार, नोकरदार यांचे आर्थिक गणित बिघडलेले दिसत आहे. तर रोजच्या वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांमुळे सर्वच आर्थिक चक्रे बिघडत असल्याचे दिसत आहे.

परंतु सीमावर्ती महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सीमाभागातील कर्नाटकच्या पेट्रोल पंपांचा काही प्रमाणात फायदा होत आहे. प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये ७ ते ८ रुपयांची बचत होत असल्याने येथील नागरिक कर्नाटकच्या पंपावर गर्दी करताना दिसत आहेत. परंतु याचा फटका व आर्थिक भुर्दंड महाराष्ट्र सीमाभागात असणाऱ्या पेट्रोल पंप मालकांना सहन करावा लागत आहे.

 इचलकरंजीसारख्या मोठ्या औद्योगिक शहरातील ट्रान्सपोर्ट लाईनच्या मोठ्या गाड्या, अवजड वाहने, ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्या यासह लाट, लाटवाडी, शिरदवाड, हेरवाड, घोसारवाड, दत्तवाड येथील अनेक गावातील वाहन धारक, वडापधारक सोबतच कार व दुचाकी धारक हे सीमाभाग असणाऱ्या कर्नाटक हद्दीतील माणकापूर, बोरंगाव, पाचवा मैल याठिकाणी जाऊन आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना सीमाभागात सर्वसामान्यांच्यासह सर्वांनाच याचा फायदा होत असताना पेट्रोल पंप मालकांना मात्र याचा तोटा होत आहे.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT