तिरुवनंतपूरम; वृत्तसंस्था : धावत्या कारला आग लागून त्यात गर्भवती महिला आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला. कारमधील अन्य चारजण बचावले. ही दुर्घटना कन्नूर जिल्ह्यात कुट्टीअत्तूर येथे घडली.
महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने कुटुंबीय तिला रुग्णालयात नेत असताना वाटेत कारने अचानक पेट घेतला. रिशा (26), प्रजित (35) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मागच्या बाजूला बसलेल्या चौघांनी दार उघडून कारबाहेर उड्या घेतल्या. चौघांना किरकोळ मार बसला आहे. कारने पेट घेतल्यानंतर चालकाने ती थांबविली. कारभोवती लोकांची गर्दीही जमली होती; पण पुढच्या सीटवरील रिशा, प्रजित आणि चालकाला वाचवण्यासाठी हे लोक फार काही करू शकले नाहीत. पेट्रोल टाकीचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो, अशी भीती सर्वांना वाटत होती, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
अधिक वाचा :