पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तत्काळ यावर प्रतिक्रिया देत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ( INDIA bloc without Mamata Banerjee )
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, इंडिया आघाडी पश्चिम बंगालमधील निवडणुका ही आघाडी प्रमाणेच लढेल. तसेच तृणमूल काँग्रेसबरोबरील आमची जागा वाटपाची चर्चा फलदायी ठरेल आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशिवाय इंडिया आघाडीची आमीही कल्पनाही करु शकत नाही, ( INDIA bloc without Mamata Banerjee )
इंडिया आघाडी पश्चिम बंगालमध्ये युतीप्रमाणेच लढेल. काँग्रेस अध्यक्ष (मल्लिकार्जुन खर्गे) यांनी अनेक वेळा घोषणा केली की भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्यासाठी सर्व भारतीय गट पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे, याचा पुन्नरुच्चारही जयराम रमेश यांनी केला.
हेही वाचा :