पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात भारताने खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरची हत्या केल्याच्या कॅनडाच्या आरोपानंतर अनेक दिग्गज व्यक्तींनी कॅनडातील विविध व्यक्तींचा विरोध केला जात आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड, बोटने कॅनेडियन गायक शुभनीत सिंग, ज्याला शुभ म्हणून ओळखले जाते, त्याच्या आगामी दौऱ्याचे प्रायोजकत्व रद्द करणार असल्याचे जाहिर केले आहे. खलिस्तानला पाठिंबा दिल्याप्रकरणी हा निर्णय कंपनीने घेतलेला आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध प्रस्थापित करुन भारताचा चुकीचा नकाशा या गायकाने शेअर केला होता. या प्रकरणाच्या विरोधात आता बोटने पाऊल उचलले आहे. या प्रसिद्ध ब्रँडने घेतलेल्या निर्णयामुळे शुभच्या वादग्रस्त कृतींकडे लक्ष वेधले आहे. शुभ 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर परफॉर्म करणार होता. मात्र प्रायोजक कंपनी बोटने हे प्रायोजक्तव रद्द केल्यामुळे हा कार्यक्रम होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. बोटने घेतलेल्या निर्णयानंतर आता आणखी काही मोठ मोठ्या कंपन्या कॅनेडियन गायकाविरोधात पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
BoAt ने ट्विटरवर पोस्ट करत लिहीले आहे की, संगीत समुदायाप्रती आमची बांधिलकी खोलवर आहे, आम्ही प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक खरे भारतीय ब्रँड आहोत. गायक शुभने केलेल्या टिप्पण्यांबद्दल जेव्हा आम्हाला समजले तेव्हा आम्ही त्याच्या कार्यक्रमातील आमचे प्रायोजकत्व मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा